PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 24, 2024   

PostImage

प्रेमात दगा देणाऱ्या प्रियकरावर गुन्हा


महिला प्रशिक्षणार्थीचे आत्महत्या प्रकरण; दीड महिन्यानंतर दखल

 

 नागपूर, क्राईम रिपोर्टर. पोलिस प्रशिक्षण केंद्र (पीटीसी) मध्ये एका महिला प्रशिक्षणार्थीने गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणात दीड महिन्यानंतर बजाजनगर पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. आरोपी तरुणाने प्रेमात दगा दिल्यामुळेच महिला प्रशिक्षणार्थीने गळफास लावल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला. निरंजन राजेंद्र नलावडे (28) रा. शिराळा, सांगली असे आरोपीचे नाव आहे.

 

मृतक महिला प्रशिक्षणार्थी प्रतीक्षा आदिनाथ भोसले (26) ही मुळची सांगलीच्या इंदापूर येथील रहिवासी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारवर्षांपूर्वी प्रतीक्षाचे लग्न झाले होते. लग्नाच्या काही महिन्यानंतरच संबंधात वितुष्ट आले आणि तिने पतीचे घर सोडले. दोघांमध्ये घटस्फोटाचा खटलाही सुरू होता. प्रतीक्षाने पुणे गाठून पोलिस भरतीची तयारी केली आणि मुंबईच्या भरतीत तिची निवडही झाली. फेब्रुवारी महिन्यात ती प्रशिक्षणासाठी नागपूरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात आली होती. या दरम्यान तिची

 

सांगलीच्या निरंजन याच्यासोबत मैत्री झाली. मैत्री प्रेमसंबंधात परिवर्तीत झाली. याच वर्षी एप्रिल महिन्यात निरंजनने प्रतीक्षाला न सांगताच दुसऱ्या तरुणीशी लग्न केले. प्रतीक्षाला याबाबत समजले आणि दोघात भांडण झाले. तेव्हापासून प्रतीक्षा तणावात होती. अधा-मधात तिचे निरंजनशी बोलणे होत होते. मात्र तो प्रतीक्षाला टाळण्याचा प्रयत्न करीत होता.

 

मृत्यूपूर्वी लिहिली सूसाईट नोट

गत 8 जुलैच्या रात्री प्रतीक्षाने वसतिगृहात पाणी टाकीच्या सिडीला ओढणी बांधून गळफास लावला. दुसऱ्या दिवशी ही गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. बजाजनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. मृत्यूपूर्वी प्रतीक्षाने सुसाईट नोट ही लिहून ठेवले होते. पोलिसांनी ते सुसाईट नोटही जप्त केले होते. त्यात प्रेम संबंधाबाबत लिहिले होते. पोलिसांनी प्रतीक्षाची आई शकुंतला भोसलेच्या तक्रारीवरून निरंजनविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.